नाचणारी मुलगी

Started by विक्रांत, June 24, 2013, 10:32:14 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

एका पायावरती नाचत
लहानगी ती थबकत थबकत
चाले आपुल्या नादात
बे दुने चार बेत्रिक बेत्रिक
बोबड गाणं काही गात
एक वेणी सुटलेली 
केसं हि होती विस्कटली
पाठीवरती दप्तर भरली
शाळा नुकती सुटलेली
होतो तिजला पाहत,हासत
मज पहिले तिने वळत
जरा थांबली ती क्षणभर
अन गोड हसली गालभर
मान आपुली तिरकी करत
अमुल्य स्मित मजला देत
मग पळाली वाऱ्यागत
ते स्मित इतके लोभस होत
कि बालपण मम हृदयात
अलगद उमलले झंकारत
कंपणात स्मृती लहरीच्या
मग मीही गेलो तसाच वाहत
एका पायावरती नाचत
तेच तिचे गाणे म्हणत ,
बे दुने चार बेत्रिक बेत्रिक

विक्रांत प्रभाकर             

sweetsunita66

छान कविता !!बालपणीचे दिवस आठवले !!
पाठीवरती   हलके दफ्तर होते
कांगारू सम उड्या मारत होते
शाळा आणि घराचा रस्ता,
कविता गिरवीत सारत होते  :D :D

vijaya kelkar

    छान कविता ........म्हणून नाचत नाचत म्हणावे वाटते ____                    _________
   'छोट्यांना छोटे दप्तर पुरेसे होते
   एका पाटीवर लिहित होते
   लिहिलेले पुसायला बोट पुरायचे
   पाटीच काम करी 'शार्पनरचे'
             शाळा सुटली पाटी फुटली...

rudra


विक्रांत

धन्यवाद ,सुनिता,रुद्र ,विजयाजी



मिलिंद कुंभारे

जरा थांबली ती क्षणभर
अन गोड हसली गालभर ....

फारच छान ......अप्रतिम ......  :) :) :)