कविता खूप काही सांगून जातात…

Started by vinod.shirodkar111, June 26, 2013, 07:24:33 PM

Previous topic - Next topic

vinod.shirodkar111

कधी मनातल्या कल्पनांची माळ गुंफून जातात,
कधी या निसर्गाच्या सुंदरतेची एक शाल विणून जातात.

कधी प्रेयसीच्या वर्णनामध्ये पान संपवून जातात,
तर कधी प्रेमभंग वेड्या कवीच्या मनातले जखम सांगून जातात.

कधी मनातल्या आठवणीच्या एक सुरेल ताल बनून जातात,
मित्रासोबत घालवलेल्या त्या क्षणाचा आस्वाद देवून जातात.

कधी मनातल्या रागाचा स्फोट होवून कागदावर उमटतात,
तर कधी पूर, भूकंप न स्कॅम वर लाचार होवून निषेद करून जातात.

या कविता एकीकडे मनातल्या भावना सांगून जातात
तर दुसरीकडे ज्या व्यक्तीने कवी बनवले तिची सारखी आठवण देवून जाते.

या कविता नेहमीच काहीना काही सांगून जातात,
अन मनात खोलवर रुतलेल्या भावनांना कागदावर लिहून जातात.

sweetsunita66

जे काही हृदयाच्या कोपऱ्यात साठलं
तेच कवितेचा मजकूर बनलं
या अबोल भावनाना  ,
लेखणीत उतारल  :)

मिलिंद कुंभारे

कविता नेहमीच काहीना काही सांगून जातात,
अन मनात खोलवर रुतलेल्या भावनांना कागदावर लिहून जातात.

फारच छान  :) :) :)

vinod.shirodkar111

Pratej

या कविता नेहमीच काहीना काही सांगून जातात,
अन मनात खोलवर रुतलेल्या भावनांना कागदावर लिहून जातात.

Amazing.......

vinod.shirodkar111

या कविता नेहमीच काहीना काही सांगून जातात,
अन मनात खोलवर रुतलेल्या भावनांना कागदावर लिहून जातात.

Amazing.......

dhanywad  ;)

vinod.shirodkar111

Manish Shah

या कविता एकीकडे मनातल्या भावना सांगून जातात
तर दुसरीकडे ज्या व्यक्तीने कवी बनवले तिची सारखी आठवण देवून जाते.