तो गेल्यावर ........

Started by विक्रांत, June 27, 2013, 11:07:55 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

तो आता मरून गेला आहे
तो जाणार हे माहित होत
तो गेल्यावर खूप खूप
रडू येईल अस वाटत होत
पण रडू फुटलेच नाही.
सव्वीस वर्ष संसाराची
त्याची माझी अन
या वन रूम किचनची
दोनच रूम दोनच जीव
तिसरा स्वर गुंजलाच नाही 
सार स्वीकारलेली मी
त्याची बेकारी
त्याची व्यसन
त्याच आजारपण
माझे घरात अन घराबाहेर
रात्रंदिन खस्ता खाण ...
काहीच नाही तरीही
त्याचा आधार होता
उभ्या पिकात
बुजगावण्या सारखा
तो संसारात उभा होता
आता त्याच्या जाण्यामुळे
तसा फरक पडणार नाही
सारे ऋतू गेले पिकांचे
जमीन कधी फुलणार नाही
फक्त आठवण ठेवावी लागेल 
घरा बाहेर जातांना कि
आता कुलूप लावल्या शिवाय
कुठेही जायच नाही
त्याच्याकडे किती
कोरडेपणे मी पाहत आहे   
नको वाटत असूनही
सुटकेची एक जाणीव
मनात दाटून येत आहे
वन रूम किचन आता
केवढे मोठे वाटत आहे

विक्रांत प्रभाकर             

vijaya kelkar

 अतिशय छान, अगदी मनास भिडणारी ...

Çhèx Thakare


मिलिंद कुंभारे

उभ्या पिकात
बुजगावण्या सारखा
तो संसारात उभा होता .......

फारच छान.......

छान भावार्थ.... :)

Ankush S. Navghare, Palghar


rudra

काहीच नाही तरीही
त्याचा आधार होता
उभ्या पिकात
बुजगावण्या सारखा
तो संसारात उभा होता
vikrant he shabdh manala laggtat tuzhe...

thanx....

swara


विक्रांत

धन्यवाद विजयाजी,मिलिंद,प्राजन्कुश,Çhèx,रुद्र ,प्राची

sweetsunita66

छान  कविता !अंगावर काटा आणणारी  !