मोठा भाऊ (dedicate to my elder bro )

Started by Çhèx Thakare, June 28, 2013, 04:21:57 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

                  प्रत्येकाच्या जीवनात आपल्यला आधार देणारी, आपल्या सोबत चालणारी, आपल्याला मार्ग दाखवणारी, आपल्या सोबत दुःख वाटणारी; आणि आपल्याला त्यांच्या सुखात सामावून घेणारी काही व्यक्ती आणि त्या व्यक्तीन पैकी एक अशी व्यक्ती असते कि तू खूप जवळ असते आपल्या. माझ्या जीवनात सुद्धा अशी व्यक्ती आहे कि ती माझ्या प्रत्येक सुखात सहभागी असते आणि दुखात सुद्धा सोबत असते. मी केलेल्या माझ्या चुका मला सांगत असते आणि त्यातून सावरण्यासाठी मला वाट सुद्धा दाखवत असते. आपल्याला जन्म देणारी आपली आई असते आपल्याला खांद्यावर घेऊन खेळवणारे आपले बाबा असतात. शाळे साठी डबा करून देणारा तो आई चा हात असतो.आपल्याला खाऊ घेण्यासाठी पैसे देणारा वडिलांचा हात असतो पण आपला हात धरून शाळेत घेऊन जाणारा तो हात म्हणजे आपल्या मोठ्या भावाचा हात असतो. जाताना तिकडे जाऊ नको, कोणी काय खायला दिले तर मुळीच घेऊ नको, आई ने दिलेला डबा पूर्ण खावून घे, कोणाला तो देऊ नको. आपल्याला जर कोणी मारले तर त्याला पहिले मारणारासुद्धा आपल्या मोठ्या भावाचाच हात असतो. नेहमी पाठीशी भक्कम पणे उभा राहणारा, प्रत्येक अडचणी मध्ये अडगळ प्रसंगा मध्ये पाठ बनून उभा राहणारा, परिस्थिती सोबत लढण्याचे सामर्थ्य देणारा तो हात असतो. माझ्या आयुष्यात नेहमी त्याचे स्थान खूप महत्वाचे आहे. आता पर्यंत माझ्या प्रत्येक कर्तुत्वाला माझ्या कलेला व माझ्या जडण घडण मध्ये, मला घडवणारा तो व्यक्ती म्हणजे माझा मोठा भाऊ. मला नेहमीच एक दिशा दाखवणारा आणि मला नेहमी मोटीवेट करणारा माझा भाऊ म्हणजे परम दा. त्याच अन् माझ नात म्हणजे भावा पलीकडचे त्याने माझ्या आयुष्यात भावाच्या वेळेस त्याने भावाचे आणि मित्राच्या वेळेस त्याने मित्राचे पात्र अतिशय सुरेख निभावले आणि त्या पत्राला योग्य न्याय सुद्धा दिला. मला माझ्या संकट काळी त्याने कधी अंत नाही दिला.
           तो त्याचा शिक्षणा साठी बाहेरगावी असताना देखील मला कधी तो माझ्या पासून दूर गेलेला असे वाटले नव्हते. तो रोज मला फोन करून सर्व चौकशी करत असे. माझ्या अभ्यासा विषयी विचारत असे, माझे प्रोजेक्ट, माझे प्रेसेंटेशन, घरी सर्व ठीक आहे ना, आई, मम्मी, पप्पा आणि अन्नू कडे लक्ष दे हे आवर्जून सांगत असे. माझ्या सोबत एका भावा पेक्षा तो एका मित्रा सारखा जास्त राहत असे. आम्हा तिघा भावां मध्ये तो सर्वात मोठा पण स्वताचे मन मारून तो आम्हाला आवडती वस्तू देत असे. आमच्या तो नुसता मोठा नसून मोठ्या मनाचा सुद्धा आहे.
आणि आम्ही सुद्धा कधी त्याला अंतर दिले नाही आणि देणार पण नाही. तो आज आमच्यात मोठा असून आज सुद्धा तो आम्हाला वडिलांच्या ठिकाणी वाटतो आणि नेहमी वाटत राहणार, म्हणूनच नेहमी दुसऱ्यासाठी लिहिणारा मी आज हा लेख मी त्याला dedicate करतोय. Love u param da <3 <3                             

sweetsunita66


Çhèx Thakare


sanjay lokare


Çhèx Thakare