भिकारी

Started by Omkarpb, June 28, 2013, 07:28:51 PM

Previous topic - Next topic

Omkarpb

रस्तयावरचे त्याचे जीवन
शरीर हे कि नुसतेच धुळीचे कण
भ्रांत ह्याची पडली त्याला
खाणे हेच जगण्याचे कारण

हाल त्याचे नाही थोडे
दिवसभर नुसता आडवा पडे
येता - जाता कोणी उदार
टाकी एक - दोन नाणे

देव ज्यास देत नाही
भूकही त्यास देत नाही
कधी एक कधी अर्धी
चतकोर भाकरी
पोटभर होई [/size]

कोणी बघे त्रासून
कोणी न बघे पाहून
जाई चार हात लांबून
रस्त्यातील अडथळा मानून

पावसाळ्या पाउस बरसेन
रात ओली दिवसा सुकेन
पाउस भारी वाटे त्याला
कोणीतरी देतसे भरभरून

उन्हाची तर बात न्यारी
उजळून निघे गरिबी सारी
हेच भांडवल दाखवून
होई दिवसाचा धंदा भारी

हिवाळ्यात दैनावस्था
भिने शरीरात गारठा
थंडीचेच पांघरूण
असे बर्फाचा रस्ता

कुडकुडत रात दिन
जीव होई लहान लहान
जगणे कसे होईल शक्य
त्यापरीस बरे मरण

एका दिनी चमत्कार
झोप झाली उबदार
कुण्या भल्या माणसाचे
होते ते थोर उपकार
त्याच्या अंगी स्वच्छ सुंदर
होती नवी कोरी चादर

बसे सदा लपेटून
अधाशासारखे चिकटून
झाली प्रिय ती चादर
आपुल्या त्रासलेल्या प्राणाहून

परि दैवनिती थोर
देई थोडे घेई फार
देऊन शांत झोप त्यास
घेई त्याच्या तोंडचा घास

मुखवट्यात राहणारे आम्ही
मुखवटेच पाहणार आम्ही
कशी समजणार आम्हाला
त्या उबेमागच्या भुकेची लाही लाही

कोण होणार तयार
एक पैसा सुद्धा फार
ज्याच्या पाशी आहे
नवी कोरी चादर

" अरे , काय समजणार तुला ,
ह्या भिकाऱ्याची भूक काय समजणार तुला ,
जेवण जास्त झालं म्हणून टाकणारा तू
उपाशीपोटी झोपणं म्हणजे काय ते कधी कळणार तुला,
हॉटेल मध्ये हजारो रुपये खर्च करणारा तू
पाच रुपयाच्या वडापावची किंमत कधी कळणार तुला ,
अरे, 'भिकारी' शिवी म्हणून वापरणारा तू
आम्हीही माणूस असतो हे कधी उमगणार तुला,
काय समजणार तुला ......"

नाही सोडली त्याने चादर
चटके सोसले अनंत आजवर
जगून आता काय उपयोग
ना प्रेमाची उब ना आस्थेचा पाझर

नाही उरला कोणता पाश
मनी केवळ एकच आस
सुटका द्यायला हवी
ह्या नकोशा जीवास

सुखी झोप हेच खरे जगणे
नाही आता वळून पाहणे

[/size]घ्याया एक झोप उबदार ओढली कायमची चादर त्याने 

                   -
[/b][/font]Omkar [/b]

मिलिंद कुंभारे

फारच गंभीर आहे ... :(

vinod.shirodkar111

मनाला भावून गेली कविता...खरच  खूप छान....  :-[  :)

sweetsunita66

छान  कविता


Ganesh Shirsat

मनाला भावून गेली कविता...खरच  खूप छान....     :)

Vichar karayla lavnari kavita aahe..
Omkar karch mast kavita kelis.

rudra

देव ज्यास देत नाही
भूकही त्यास देत नाही
कधी एक कधी अर्धी
पोटभर होई चतकोर भाकरी
kavitetla vichar patla pan varil oli julat nahit....