प्रश्न अधांतरी

Started by विक्रांत, June 29, 2013, 11:51:00 AM

Previous topic - Next topic

विक्रांत

निष्पाप कळ्या अकाली
पडती जेव्हा गळुनी
या न त्या कारणांनी
जातो मोहर झडुनी

काय म्हणावे असल्या
या शापित प्राक्तनाला
लागे ना अर्थ इथला 
मज कश्याचा कशाला

असे जन्म काय सारा
अपघात मालिका हि ?
नच माझ्या हाती काही
वा न तुझ्या हाती काही

मरणात थांबलेले
प्रश्न अधांतरी सारे
मज नकोच कुणाची
उगा छापील उत्तरे

विक्रांत प्रभाकर

केदार मेहेंदळे


sweetsunita66

निष्पाप कळ्या अकाली
पडती जेव्हा गळुनी
या न त्या कारणांनी
जातो मोहर झडुनी!!!!!!!!!!छान


जया

न उत्तर हे असे केवळ छापिल
विस्तरिता परि अपुला दृष्टिकोन
नसलेले "शापित"
दृष्टिपथी येइल तव प्राक्तन.

कवि - विजय सुर्यवंशी.

अतिशय मार्मिक रितीने प्रश्न मांडला आहे कवितेतुन...

vijaya kelkar

हं? हं??
छापील उत्तरे नकोत .....(फक्त )होय ना?

विक्रांत

thanks kedar ,kaustubh,sunita jaya,vijayaji,vijay .