आशेवरंच जगायचे....

Started by कवि - विजय सुर्यवंशी., July 01, 2013, 01:00:51 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

......आशेवरच जगायचे.....
.
.
.
वाळवंटातल्या उन्हातले,
दाह कुणी सोसायचे...??
पिसाटलेल्या वाय्रासंगे,
भोग कुणी भोगायचे...??
.
.
.
भेगाळलेल्या जमिनीच्या,
चिरा कुणी बुजवायच्या...??
आभाळंच फाटले जिथे,
ठिगळ कुणी लावायचे...??
.
.
.
मनातल्या चिय्राभधले,
सांधे कुणी सांधायचे...??
रापलेल्या मनामध्ये,
कापरे कुणी भरायचे...??
.
.
.
सारे जर असेल असेच,
तुम्ही-आम्ही तडफडायचे...??
पालवी फुटेल कधी तरी,
म्हणुन आशेवरंच जगायचे...??
.
.
. UNKNOWN.....

rudra

भेगाळलेल्या जमिनीच्या,
चिरा कुणी बुजवायच्या...??
आभाळंच फाटले जिथे,
ठिगळ कुणी लावायचे...??
.
.
oli avdlya....
kaviraj naav liha....

कवि - विजय सुर्यवंशी.

#2
रुद्रा सदरची कविता ही मला एका पानावर सापडली जो किराणा दुकानाच्या खाऊ सोबत होता ... SORRY , UNKNOWN लिहायचं राहीलं.....

sweetsunita66


कवि - विजय सुर्यवंशी.


vijaya kelkar

               छान आहे कविता
''कवीचे नाव माहिती होईल ...या आशेवर जगायचे !!!''

कवि - विजय सुर्यवंशी.

vijayaji मिळुन शोधुया.