ऋण

Started by Vikas Vilas Deo, July 01, 2013, 09:32:54 PM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo

चंदनासम झिजून,
तुम्ही आम्हास सुगंध दिला.

निरांजनासारखे जळत,
तुम्ही आम्हास प्रकाश दिला.

सूर्यासारखे धगधगत,
तुम्ही आम्हास ऊब दिली.

वृक्षासारखे कष्टून,
तुम्ही आम्हास श्वास दिला.

पर्वतासारखे अटळ राहून,
तुम्ही आम्हास आधार दिला.

नदीसम सतत वाहत,
तुम्ही आम्हास जीवन दिले.

मरूताप्रमाणे वाहत,
तुम्ही आम्हास प्राण दिला.

आकाशाप्रमाणे झेलून कष्ट सारे,
तुम्ही आम्हास आश्रय दिला.

गुरूप्रमाणे ज्ञान देवून,
तुम्ही आम्हास आकार दिला.

ऋण कसे फेडावे तुमचे आई-बाबा,
तुम्हीच तर आम्हास जन्म दिला.

sweetsunita66

!!वाह छान !!आवडली कविता ...  :) :)

मिलिंद कुंभारे


vijaya kelkar

  छान ,मातृदेवो भव  ,पितृदेवो भव .

rajesh ranadive


salunke

chan aahe kavita.

aspradhan

Very good indeed!!!

Vikas Vilas Deo

सर्वांचे मनापासून धन्यवाद.