असा कसा हा दंगा

Started by Vikas Vilas Deo, July 01, 2013, 09:43:06 PM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo

कसा हा दंगा
माणूस झाला नंगा
असा कसा हा दंगा

रक्ताची आरोळी,
आक्रोशाची चारोळी,
मुर्दाडांची रांगोळी,
शवावर भाजली जातेय पोळी,
मृत्यूचा वाजतोय डंका,
असा कसा हा दंगा.

मानवतेचे मुडदे,
भावनेचे धंदे,
मरण्या मारण्यासाठी चंदे,
सारेच झाले गंदे,
वाहत आहे रक्ताची गंगा,
असा कसा हा दंगा.

मत्सरतेचे पिक फुले,
पशूसम मानव लढे,
रक्तामासाची पडती सडे,
मानवास माणुसकीचा विसर पडे,
प्रेमाचा थेंब न राहीला मानवाच्या अंगा.
असा कसा हा दंगा |

सगळी कडे मारामारी,
भगवंता तुच आम्हा तारी,
पुन्हा अवतार घे अवतारी,
शांततेचा संदेश देण्या ये संसारी,
बघ कसा चालू आहे दंगा.
असा कसा हा दंगा.

अभिलाष

सगळी कडे मारामारी,
भगवंता तुच आम्हा तारी,
पुन्हा अवतार घे अवतारी,
शांततेचा संदेश देण्या ये संसारी,
बघ कसा चालू आहे दंगा.
असा कसा हा दंगा.

----------------------------------

"अवतार असे मी भगवंताचा;
न देण्या केवळ संदेश शांततेचा
अवतार असे हा माझा;
त्याशिवाय लाभ करुन देण्याचा
सौख्य-समृद्धी आदी सगळ्याचा
व्यक्तीस हरेक, उद्देश असे माझा."
करतो जाहीर कुणी शाहीर बिलंदर चोर
अधुनीमधुनी, लबाड लुंगासुंगा
असा चालू असे नंगा दंगा.