good-bye

Started by विक्रांत, July 02, 2013, 10:33:55 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

दारावर लाव तोरण 
रांगोळ्यांनी भर आंगण
जात आहे मी आता
आनंदाने जग जीवन

किती वर्ष मजला तू
केले आहेस सहन
सुखासाठी तुझ्या आता
आडकाठी ना बंधन

त्या तुझ्या सुखास तेव्हा
माझी ना कधी नव्हती
काय करू तुझी माझी
दुनिया वेगळी होती

त्या तुझ्या सुखात माझे
नसणे तुज खुपले
माझ्यासवे म्हणुनी तू
सुख हि दूर लोटले

पहा तुझे अवघे ते
कुढणे आता सरले
ना परतीच्या वाटेला
पावूल माझे पडले

विक्रांत प्रभाकर             

vijaya kelkar

     त्या तुझ्या सुखात माझे
      नसणे तुज खुपले
    माझ्यासवे म्हणून तू
      सुखही दूर लोटले
............छान ...

कवि - विजय सुर्यवंशी.

विक्रांत छान शैली होती कवितेची. अक्षरशः खरा प्रसंग डोळ्यांसमोर तरळला....
.
.
.
पहा तुझे अवघे ते
कुढणे आता सरले
ना परतीच्या वाटेला
पावूल माझे पडले

rudra

mastach...vikrant..

विक्रांत

thanks ,vijayaji,vijay,rudra.

Madhura Kulkarni


Pratej10


sweetsunita66

त्या तुझ्या सुखात माझे
नसणे तुज खुपले
माझ्यासवे म्हणुनी तू
सुख हि दूर लोटले ..........nice poem  :)

विक्रांत

धन्यवाद Pratej10,सुनिता