भावना रुपी धरेला आता जपायला हवं....

Started by कवि - विजय सुर्यवंशी., July 02, 2013, 10:43:59 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

भावना रुपी धरेला आता जपायला हवं....
.
.
.
भावना रुपी धरेला आता जपायला हवं....
आयुष्याच्या वेड्या वळणी मनाला सावरायला हवं....
.
.
.
रोजंच माडतो पसारा  मनाच्या घरात....
आठवणींच्या या पसाय्राला आता आवरायला हवं....
.
.
.
बालपणीच्या बागेत बागडलो मनसोक्त....
वास्तवाच्या जगती आता दौडायला हवं....
.
.
.
काळजाला तडे देणारे भेटतात सर्वजण....
कुणा आपल्यासोबत या तड्यांना सांधायला हवं....
.
.
.
प्रवासी तर नेहमी भेटतात चालताना....
कुणा परक्याला प्रेमाने आपलंस करायला हवं....
.
.
.
इमले स्वप्नांचे तर रोजच रचतो मनात....
घर प्रितीचं आता सईसाठी बांधायला हवं....
.
.
.
आयुष्यात हरत तर नेहमीच आलो....
कुणाच्या आशेसाठी आता जिँकायला हवं....
.
.
.
शब्दांच्या दाहकतेने दुर केले नात्यांना....
रेशमाच्या धाग्यांनी या नात्यांना आता विणायला हवं....
.
.
.
भावना रुपी धरेला आता सावरायला हवं....
आयुष्याच्या वेड्या वळणी सावरायला हवं....
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)

vijaya kelkar

    छान विचार अन त्यामुळे छान कविता ...
''भावना रुपी धरेला आता जपायला हवे
              यांत्रिकी अभियंत्या कळले यंत्रात वंगण घालायला हवे ''

कवि - विजय सुर्यवंशी.

आभारी आहे विजयाजी....
.
.
.
पण बहुदा माणस हल्ली विसरतात, यंत्राचे भाव जाणणाय्रा यांत्रिकी अभियंत्यांना सुध्दा भावना असतात.... वंगणाचं नंतर पाहता येईल हो....

vijaya kelkar

  अगदी बरोबर,तेच म्हणते ..
         ''माणसाच्या मन रुपी यंत्रास वंगण घातले कि त्यास कळेल हे .....''

कवि - विजय सुर्यवंशी.

सहमत आहे विजयाजी....
.
.
.
यांत्रिकीकरणाच्या या जगती त्याच्या मनाचा बोंझाय झालाय... :) :D

vijaya kelkar

  सारेच बोन्साय नाहीत.. काहींना तर अजून अंकुर फुटतोय.. :)

rudra


sweetsunita66

या जगती भावना असे सर्व प्राणी मनुष्या
भावनेच्या आहारी जाऊन तडे जाईल आयुष्या
तो असो अभियंता  अथवा  कवी
प्रत्येकालाच जगण्या साठी प्रेमाची साद हवी .... सुनिता  :)कविता छान जमलीय   :)

कवि - विजय सुर्यवंशी.