तो

Started by कौस्तुभ (मी शब्दवेडा), July 03, 2013, 02:41:13 PM

Previous topic - Next topic


आज पर्यंत तो माझ्या मनात,
खूप खोलवर दडलेला होता...
आता खूप दिवसांनी तो,
मनात दडलेल्या कुठल्यातरी कोपर्यातून, बाहेर येवुन माझ्या बरोबरच रहायला लागला होता...

आज पर्यं त्याला मी आणि मला तो असण्याची,
कधीच जाणीव नव्हती... कारण आम्हा दोघांना एकमेकांची गरज,
कथीच भासली नव्हती...

तसे आम्ही दोघे एकमेकांशी, 
कधीच  बोललो नव्हतो...
त्याने आज मला अचानकचविचारले,
का रे बाबा आता खूप उदास उदास असतो..?

त्याच्या प्रश्नावर मी,
काही उत्तरच दिलं नव्हत ...
त्याला मी अस सांगणार तरी काय होतो,
कारण मला माझ दुख्: कधी वाटायला आवडलच नव्हत ...

खूप जण आयुश्यात आले, अन येवुन निघुन गेले,
पण हा खरा  माझा तो माझाच राहीला...
मी कुठंही भरकटत गेलो,
तरी माझ्या मागे येत राहीला...

आयुश्यात सार्या गोष्टी क्षणिक असतात,
येनारा  प्रत्येक क्षणही आपली साथ सोडत असतो...
पण एकटेपणा आपली साथ कधीच सोडत नाही,
तो नेहमी आपल्या बरोबरच असतो...

माझ्या बरोबर असनारा 'तो'ही माझा एकटेपणाच आहे ..
आता आम्ही दोघेच असतो,
गजबजलेल्या या जगात कुठतरी दूरवर बसलेले ...
तर कथी काळोख्या रात्री,
भयाण स्मशान शांततेत बसलेले...

© कौस्तुभ

vijaya kelkar

 हं! हं!!
छान !!!


sweetsunita66