"चांदरात"

Started by कवि - विजय सुर्यवंशी., July 03, 2013, 10:28:56 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.


      "चांदरात"
.
.
.
"चांदण्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात....
मी सईला पाहिलं....
पाठमोय्रा लोभस तिच्या प्रतिमेला....
प्रेमळ नजरेने न्याहाळलं....
.
.
हळवं माझं मन....
तिच्यात गुंतत गेलं....
कळालंच नाहि कधी....
नातं प्रितीचं उमलत गेलं....
.
.
चांदण्यांच्या प्रकाशात फुले प्रितीची वेचताना....
साथ आम्हास चंद्राची होती....
प्रितीच्या अशा एकांत समयी....
सई  माझ्या  मिठीत होती....
.
.
ना मनी कोणते गुज....
ना कसली भ्रांत होती....
मिटलेल्या पापण्या अन थरथरते ओठ....
फक्त शहाय्रांचीच भाषा मनात होती....
.
.
गुज मनांचे आता....
मनांना कळाले होते....
गंधित आरक्त ओठांना....
आता ओठ मिळाले होते....
.
.
श्वासांच्या  स्पंदनांचा वेग....
आता वाढला होता....
मनातील भावनांनी हा....
मार्ग प्रितीचा काढला होता....
.
.
प्रितीच्या या हाकेला साद मिळाली होती....
मिणमिणणाय्रा चांदरातीला प्रित उजळली होती....
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
       (यांत्रिकी अभियंता)

मिलिंद कुंभारे


कवि - विजय सुर्यवंशी.

मिणमिणणाय्रा चांदरातीला प्रित उजळली होती....

क्या बात ...  :) :) :)
.
.

sweetsunita66

हळवं माझं मन....
तिच्यात गुंतत गेलं....
कळालंच नाहि कधी....
नातं प्रितीचं उमलत गेलं....
.
छान !!आवडली कविता  :) :)

कवि - विजय सुर्यवंशी.


कवि - विजय सुर्यवंशी.

सुनिता मीच आपला आभारी आहे. भेंड्यांच्या खेळातचं ही शृंगारिक कविता सुचली..... :)

sweetsunita66


Pratej

प्रितीच्या या हाकेला साद मिळाली होती....
मिणमिणणाय्रा चांदरातीला प्रित उजळली होती....

Ati Sundar....

कवि - विजय सुर्यवंशी.

आभारी आहे प्रतेज :)