तुझे नसणे … स्वप्न अधुरे ……

Started by मिलिंद कुंभारे, July 04, 2013, 02:40:50 PM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

तुझे नसणे ... स्वप्न अधुरे ......

तुझे नसणे
जगण्यास माझ्या
ग्रहण जसे
स्वप्नवत सारे
स्वप्नातच तुझे भेटणे
अंश मी तुझे
कि माझ्यातच
अंश तुझे
चाहूल तुझी
कि भास मनाचे ......

दिस सरले
ऋतू बदलले
नभ एक चिमुकले
ओंजळीत माझ्या
नकळत  अवतरले
त्याचे बिलगणे
त्याचे खिदळणे
बा~ बा ~ असे
बोबडेच बोलणे
सारेच कसे लुभावणे ......

मज कळेना
तुझे नसणे
खंत असे
कि तुझे असणे
सत्य दुजे
दु:ख अंतरीचे
कि सुख परतीचे
आभास म्हणावे
कि मज आशिष तुझे
क्षण फसवे
खेळ नियतीचे
कि गतजन्मीचे
तुझे, स्वप्न अधुरे ......

मिलिंद कुंभारे


sweetsunita66

अतिशय सुंदर कविता  :)
मज कळेना
तुझे नसणे
खंत असे
कि तुझे असणे
सत्य दुजे
दु:ख अंतरीचे
कि सुख परतीचे
आभास म्हणावे
कि मज आशिष तुझे..........तुझी प्रतिछाया ओंजळीत माझ्या
                                   होईल का मी सांग ऋण उतराई तुझा.......... सुनिता

मिलिंद कुंभारे

sweetsunita......फारच छान :)

तुझी प्रतिछाया ओंजळीत माझ्या ......
गतजन्मी राहून गेले ऋण काही फेडाया ......
पुन्हा लाभली तू मज होऊन एक  प्रतीछाया ......
ऋण फेडण्या हा जन्म माझा पुन्हा तुज मी अर्पिला ....

sweetsunita66


vijaya kelkar

कविता मनास अति भावली
    हासता ओंजळीतली प्रतिसावली
       आभास नाही ही चिमुकली
          सहवास सुखी करील पावलोपावली

मिलिंद कुंभारे


हासता ओंजळीतली प्रतिसावली
आभास नाही ही चिमुकली ....... :)

विजयाजी ..
फारच सुंदर ...
प्रतिसादाबद्दल धन्यवाद .... :)


केदार मेहेंदळे


मिलिंद कुंभारे


मिलिंद कुंभारे