प्रेम हवे तर

Started by विक्रांत, July 04, 2013, 03:36:11 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

प्रेम हवे तर
अटी पूर्ण कर
फूट नाहीतर
इथुनिया ||१||
ने फिरावयास
मज दूरवर
सुंदर सुंदर
देश दाखव ||२||
गाडी हवी मज
घर हवे मज
नजराणा रोज
पेश कर ||३||
हवे नटवणे
नवी प्रावरणे
सुवर्ण दागिने
यथोचित ||४||
सारे रविवार
भटकू बाहेर
खाऊ मजेदार
नवे डिश ||५||
आपण दोघेच
असू राजा राणी
तिसरे कुणी
नको मज ||६||
असेल मंजूर
तर मी तुझी
अन्यथा गावची
शोध वधू ||७||
असा रोकठोक
माझा व्यवहार
गमेल  व्यापार
तुज जरी ||८||
तुही असशील
दमला शोधून
ये मग मोजून
दाम जरा ||९||
फुकट मिळते
काय प्रेम ते
जीवन असते
घेणे देणे  ||१०||

विक्रांत प्रभाकर             

मिलिंद कुंभारे

विक्रांत...
फारच छान.... :D :D :D

नाही मंजूर मज असली अट
त्यापरीस शोधील मी गावचीच एक
नकोत मज सुंदर सुंदर देश
प्रिय मज आजही ते हिरवेगार शेत......

नको ते सारखे सारखे खर्चिक जेवणे
सदा बाहेरचे, प्रकृतीला न साजेसे
त्यापरीस मज आवडते
ज्वारीची भाकरी अन मिरचीचे ठेचे
आहार सकस ह्यापरी दुजा नसे .......

नको मज तुझे  प्रेम असे,
ज्यात नसे प्रेम खरे,
प्रेम माझे लाख मोलाचे,
नाही जमणार मज हे देणे घेणे.......

मिलिंद कुंभारे  :)


rudra


sweetsunita66

वाह! वाह!! विक्रांतचा चौक अन त्यावर मिलिंदचा जोरदार छक्का :) :) :)

विक्रांत

 :D :D  एकदम झकास मिलिंद .