ऋतू पावसाळा, आयुष्यातला ……

Started by मिलिंद कुंभारे, July 06, 2013, 10:18:30 AM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

ऋतू पावसाळा, आयुष्यातला ......

नाही आवडत मज तेव्हा
तो ऋतू पावसाळा,
आयुष्यातला....

खेळ निराळा त्याचा फसवा,
बेसावध बघून मजला,
धो धो बरसतो जसा,
करतो मज चिंब ओला,
सांडून जातो नयनी माझ्या,
पूर वेदनांचा ......
सांग मजला शोधू तेव्हा,
मी आधार कुणाचा ????

नाही आवडत मज तेव्हा
तो ऋतू पावसाळा,
आयुष्यातला....

कधी ढगांआड लपतो, गरजतो नुसता,
तहानलेला बघून मजला,
न बरसताच, हसतो नुसता......
सांग मजला शोधू तेव्हा,
कुठे अन कसा ???
झरा एक पानावलेला,
क्षमवू कसा मी माझी तृष्णा ???

नाही आवडत मज तेव्हा,
तो कोरडा, ऋतू पावसाळा,
आयुष्यातला ......

मिलिंद कुंभारे

rudra


sweetsunita66

छान कविता मिलिंद !आवडली  :)

मिलिंद कुंभारे


मिलिंद कुंभारे