दिंडी मधले दुख सावळे

Started by विक्रांत, July 06, 2013, 05:01:03 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

दिंडी मधले | दु:ख सावळे |
पुन्हा दाटले | शब्दामध्ये ||१||
पुन्हा मनाचा | बांध फुटला |
उर भरला | तव प्रेमे ||२||
पुन्हा जीवाला | भूल पडली |
चालू लागली | वाट जुनी ||३||
स्वप्न साजिरे | एक निळूले |
मनी जागले | आज पुन्हा ||४||

विक्रांत प्रभाकर             

केदार मेहेंदळे


sweetsunita66

पहा दिंडी चाले पंढरीची वाट
अरे विठूराया तुझा पहावया थाट
असेल रोकण्या  धोंडे अन काटे ,
तुझीया नामाचा मनी गजर हा दाटे
असेल पायांना रक्ताळलेल्या भेगा
मिळाया आशिष रे तुझा ,न्हाऊ चंद्रभागा .... सुनिता  :)


sweetsunita66