वारीचा वारकरी

Started by aap, July 06, 2013, 05:34:21 PM

Previous topic - Next topic

aap

वारीचा वारकरी

आषाढी कार्तिकी पंढरीची वारी
दंग भजनात वारीचे वारकरी

डोई तुळस हाती भगवा झेंडा
गळा तुळशीमाळा भाली चंदनाचा टिळा

टाळ मृदुंग चिपळ्या होतो नामाचा गजर
भक्ती रसात उधळती गुलाल अबीर

नाही उन पाऊस नाही थंडी वारा
हरी भजनात दंग होतो साऱ्याचा विसर

पंढरीची वारी पुण्य पडते पदरी
सदा घडो सेवा आस ही अंतरी

आलो गळा भेटी ठेवावी कृपा दृष्टी
वारीचा मी वारकरी आलो पंढरपुरी

                                         सौ. अनिता फणसळकर

sweetsunita66

छान कविता अनिता ! :)


टाळ मृदुंगाच्या तालावर नाचतात वारकरी
भक्तांच्या तालावर बेधुंद झालाय हा हरी
              भक्त नाम्या तुक्या कान्होपात्रा अन वारकरी
            निघालेया  पंढरी अन  विठू नामाचा गजर करी ......sunita


केदार मेहेंदळे