सांग हे खरे आहे का?

Started by kuldeep p, July 06, 2013, 10:33:44 PM

Previous topic - Next topic

kuldeep p

तुझ्यात आणि माझ्यात एक वेगळे नाते आहे
सांग हे खरे आहे का ?
क्षणोक्षणी माझी आठवण काढतेस
एकांतात माझी  नक्कल करतेस
सांग हे खरे आहे का ?
तुझ्या मैत्रिणी नावाने माझ्या चिडवतात तुला
आणि तू मात्र गालातल्या हासतेस
सांग हे खरे आहे का ?
मी  नसलो कि बेचैन होतेस
समोर आलो कि मात्र लाजून जातेस
सांग हे खरे आहे का ?
नेहमी माझ्या फोनची वाट बघतेस
एकांतात मात्र स्वताशीच बोलतेस
सांग हे खरे आहे का ?
मी आजारी असलो कि दुखी तू असतेस
बरा व्हावे म्हणून देवाकडे प्रार्थना तू करतेस
सांग हे खरे आहे का ?
माहिती आहे जीवापाड प्रेम माझ्यावरच करतेस
पण मी विचारायची वाट बघतेस
सांग हे खरे आहे का?
एवढे प्रेम करतेस माझ्यावर
मग बोलायला  का घाबरतेस  घाबरतेस?
मग बोलायला  का घाबरतेस  घाबरतेस?

Ankush S. Navghare, Palghar


sweetsunita66

  लाजाळू बिचारी प्रियतमा
  कशी बर  सांगेल स्व-प्रेमा
  देवूनी निशाणी अनुपमा
  गाली  खळी देई साद तुम्हा............ सुनिता :)

kuldeep p


मिलिंद कुंभारे

नेहमी माझ्या फोनची वाट बघतेस
एकांतात मात्र स्वताशीच बोलतेस ....

जीवापाड प्रेम माझ्यावरच करतेस
पण मी विचारायची वाट बघतेस .....

praajdeep.....
फारच छान..... :)

प्रेमात पडल्यावर हे असेच घडते ....
सगळेच  खरे आहे ते ............

Çhèx Thakare

हो.   . . . . 

एकदमच खरे आहे 

अतिशय सूंदर

पिंकी

सगळेच  खरे आहे ते ............ :) :) :)

kuldeep p


arpita deshpande

प्रेम समजून घ्यायचे असते रे ...
मी सांगणार तेव्हा तुला  कळणार ....
यात प्रेमाची काय ती किंमत राहणार ....:P


अतिशय सुंदर कविता ...:)