आरसा (1)

Started by केदार मेहेंदळे, July 08, 2013, 12:00:28 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

घरातल्या आरशात स्वतःच, प्रतिबिंब मी बघतो
आरशातल्या प्रतिबिंबात  मला, अनोळखी मी भासतो
बिन चेहऱ्याच्या माणसांत मी, आपलं माणूस शोधतो
आरशातल्या प्रतिबिंबात, स्वतःलाच मी शोधतो

केदार...

ह्या माझ्या चारोळी वरून पुढे लिहिलेली कविता
*******************************************
आरसा (1)[/font]

एकटाच असतो तेंव्हा मला
साथ देतो आरसा
अनोळखी लोकांच्यात मला
माझ्याशी भेटवतो आरसा

वर्तमानाशीच फक्त घेणं त्याला
भूतकाळात डोकावत नाही आरसा
आत्ता काय आहे तेच दाखवतो
भविष्य दाखवत नाही आरसा

चेहरा स्वच्छ दिसत नाही
मळला असेल जरी आरसा
चेहर्यावरचा डाग लपत नाही
स्वच्छ असेल जरी आरसा

खरं तेच बोलतो पण
पूर्ण खरं बोलत नाही आरसा
चेहराच फक्त दाखवतो
मन दाखवत नाही आरसा

(आरसा (२) पुढल्या भागात)
केदार...

shashaank

kyaa baat hai kedaar - khoopach sundar lihile aahes ....

rudra


sweetsunita66

केदार, मस्त कविता ....  :)

vijaya kelkar

खूपच छान कविता.

मिलिंद कुंभारे

चेहराच फक्त दाखवतो
मन दाखवत नाही आरसा.....

क्या बात ....केदार दादा ..... :)