कोंडी

Started by swatium, July 08, 2013, 11:13:29 PM

Previous topic - Next topic

swatium

कोंडी

कधी एक एक शब्दाची भ्रांत पडते

माणसा विना

घर ओस पडतं

शब्द आणि माणसांची

भीक मागावीशी वाटते

माणसाचं वेड असण्यापेक्षा

माणुसघाण्या  एकलकोंड्या

माणसांचा हेवा वाटतो

...भिंती  सुद्धा रुसतात

अचानक सौंदर्य....  काव्य सारे

पृथ्वीच्या गर्भात लुप्त होतात

जणु .... अवघ्या विश्वावर

आवस पसरते

'आदि' ... 'अंत' हरवतात

सारे संदर्भ तुटतात

प्रश्नाचिन्हात

एक चेहेरा दिसतो

आपलासा वाटतो

तरी पूर्ण अपरिचित

उत्तर शोधण्याची गरज नसते

पण

कुठं  तरी

हि अवस्था संपवायची असते

'कोंडी 'फोडायची असते

म्हणून कदाचित फ्रस्ट्रेशन असावे

कदाचित डिप्रेशन असावे

असे म्हणून मोकळी होते

प्रश्न चिन्हाला  उशाशी घेऊन

निजण्याचा वृथा प्रयत्न करते  ...... !

..................स्वाती मेहेंदळे


केदार मेहेंदळे

प्रश्न चिन्हाला  उशाशी घेऊन

निजण्याचा वृथा प्रयत्न करते  ...... !
shevati prashnchinhach....

sweetsunita66

छान जमली कविता  :)