ह्या जगात खरच प्रेम असते का...

Started by Ankush S. Navghare, Palghar, July 08, 2013, 11:30:56 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

ह्या जगात खरच प्रेम असते का...
कधी कोण कोणासाठी झुरत का
ह्या जगात खरच प्रेम असतं का
मग का तुटतात अचानक नाती
मग का होतात मने वेगवेगळी
प्रेमाच्या नात्याला तितके महत्व नसते का
ह्या जगात खरच प्रेम असते का...
प्रेमाच्या आणाभाका घेतात
जीवनभर साथ देण्याच्या शपथा घेतात
आणि मग अचानक मला विसरून जा
असेही म्हणून मोकळे होतात
मग शपथ घेतलेले प्रेम
हे प्रेमच असते का
ह्या जगात खरच प्रेम असते का
प्रेमासाठी वाट्टेल ते करतात
जन्मदात्यांना एकटे सोडून
आत्महत्या हि करतात
प्रेम असेच बळी मागते का
ह्या जगात खरच प्रेम असते का...
कधी प्रेम नाही मिळालं तर स्वतः मरतात
कधी आपल्या प्रेमावर acid फेकतात
प्रेम इतके निष्टुर असते का
ह्या जगात खरच प्रेम असते का...
कधी इज्जतीची पर्वा न करता
घर सोडून पळतात
कधी इज्जतीची पर्वा करत
प्रेमाचा बळी देतात
प्रेम हेच सर्व शिकवते का
ह्या जगात खरच प्रेम असते का...
असे खुप प्रश्न आहेत त्याची उत्तरे नाहीत
ह्या प्रश्नांची उत्तरे कधी काही असतील का
ह्या जगात खरच प्रेम असते का...
ह्या जगात खरच प्रेम असते का...

... प्राजुन्कुश
... Prajunkush.

sweetsunita66


Ankush S. Navghare, Palghar


मिलिंद कुंभारे

Prajunkush,
छान.....

होय खरं प्रेम असतंय कि :) ...पण फार दुर्मिळ .... :(   
ते कधी तिच्या  नयनांत दिसतं  ....
तर कधी तिच्या शब्दांत जाणवतं ......
फक्त आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे....
आणि प्रत्येकालाच  ती कला अवगत असते असे नाही ......  :(

Ankush S. Navghare, Palghar



Ankush S. Navghare, Palghar


SANJAY M NIKUMBH

khar prem aste yat vadch nahi prem hi ek bhavna aste ti khari havi prem jagan badlavun takat
pan khar prem karan khup kathin asat ....prem honyapeksha te tikavan KATHIN ASTE