माझे शब्द

Started by Ekant, July 09, 2013, 04:30:30 PM

Previous topic - Next topic

Ekant

एकदा ठरवले स्वत:शी छानशी कविता बनवावी,
जुळवून सार्या भावनांना एक कल्पना करावी ।

घाईघाईने घेतले एक स्वच्छ शुभ्र पान,
आणि निळी शाई जी शोभेल पानाला छान ।

सुरूवात केली लिहीण्यास पण नाही मिळाले शब्द,
का होते असे? यावर माझे मन झाले नि:शब्द ।

ज्या भावनांचा होता आधार त्या तर मनीच गाठल्या,
ओळच काय तर शब्दाचा लाटा पूर्णत: आटल्या ।

खूप विचार करून शेवटी इच्छाच माझी तुटली,
कविचेच्या नादात साधी एक रेघ नाही उटली ।

जुळली ना कविता वाटली स्वत:ची लाज मला,
घ्यावे मत कवींचे होईल मदत माझ्या कवितेला ।

कविताकारांची मते म्हणजे काय एकदम भनाट,
ऐकून त्यांची मते डोक्याची लागली चांगलीच वाट ।

एक म्हणे त्यासाठी हव शब्दांचे भांडार अनंत,
दुसरा म्हणे जुळवण्यात यमक असाव पटाईत ।

एक तर म्हणू लागला त्यासाठी असावे ह्रदय,
म्हणजे माझ्याकडे ह्रदय नाही आहे की काय?

एका हुशाराने तर मला अलगच काही सांगितले,
कसला हुशार उगाचच त्याने माझे डोके दुखवले ।

म्हणू लागला इतके सोपे नाही कविता बनवणे,
जीवनात यावे लागते प्रेमभंगाचे गोड विष पिणे ।

या भाष्याने माझ्या मनावर कित्येक घाव केल्या,
अखेर कविता बनविण्याच्या इच्छाच भंग झाल्या ।

म्हणालो मनाशी कविता बनवणे नाही आपले काम,
भावनांना जुळवण्याच्या कल्पनेला केला रामराम ।

मिलिंद कुंभारे

 म्हणू लागला इतके सोपे नाही कविता बनवणे,
जीवनात यावे लागते प्रेमभंगाचे गोड विष पिणे । :D :D :D

very nice try......keep it up... :) :) :)

sweetsunita66

तुमचे तर असच झालं कि....कविता कराया गेलो तेव्हा यमक छंद जुळेना
                               नाही म्हणता  कविता कधी जमली कळेना .....छान  :)

केदार मेहेंदळे

nahi nahi mhnata mhnta kavita banali ki :)

vijaya kelkar

राम-राम हा तर नव्हे अखेरचा
राम-राम हा तर प्रथम भेटीचा
---------राम-राम --------