शोध

Started by Shona1109, July 12, 2013, 04:01:39 PM

Previous topic - Next topic

Shona1109

तो एक क्षण .... पूर्ण असूनही अधुराच
तुझ्या डोळ्यात स्वतःला पाहता पाहता कापुरासारखा भुर्रुकन उडून गेला
जाताना स्वतःची नवी ओळख घडवून गेला
पहिल्यांदाच अशी इतकी खोल गेली होती
झाडांच्या मुळांसारखी स्वतःलाच शोधत
आतापर्यंतची "मी" आणि ह्या आताच्या क्षणाला असलेली "मी"
किती भिन्न रूपे ... माझीच .... ?
नजरेला नजर भिडवण किती कठीण वाटायचं मला
मग त्याच्यात स्वतःला विरघळन तर दूरच राहील
कधी जाणून पण नाही घेतल कसली भीती वाटायची ती ...
त्या डोळ्यांमध्ये दिसणाऱ्या स्वतःच्याच  प्रतिमेची कि .... त्या डोळ्यांत स्वतःला  हरवण्याची.... माहित नाही
पण तुझ्या डोळ्यात स्वतःला निरखताना एक वेगळीच शांतता वाटली
तिथे सूर्याची प्रखरता नव्हती ... होत ते फक्त पौर्णिमेच शीतल चांदणं ....
निश्चिंतपणे हरवावं इतक नितळ
हरवण पण कसलं .... स्वतःचाच शोध घ्यायची एक नवी वाटचाल  भेटावी तसचं
तुझ्या डोळ्यात भटकताना नवीन वळण दिसलं
हो तेच वळण जिथे तुझी भेट झाली होती
अन आयुष्याला एक वेगळीच कलाटणी लागली
तशी जीवन गाडी तुझ्याकडे बेभान धावली
तू त्या क्षितिजासारखा .... जेवढ जवळ जाव तेवढच दूर पळणारा
नुसत वाट पाहायला लावणारा आणि दम लागेपर्यंत धावायला भाग पाडणारा
मी मात्र त्या क्षितिजाला गाठायला तत्पर होती
पण तुझ्या स्पर्शाने पूर्ववत भानावर आणलं
अन अंत न गाठताच वाटचाल तुझ्यापर्यंत येऊन थांबली
वाटल होत काही अंतरानंतर शोधाला अंत लाभेल  .... पण तस नसत
शोध कधी संपत नाही  आणि संपतो ते फक्त आपण..Shona

sweetsunita66

त्या डोळ्यांमध्ये दिसणाऱ्या स्वतःच्याच  प्रतिमेची कि .... त्या डोळ्यांत स्वतःला  हरवण्याची.... माहित नाही ..............
           छान  लिहिलस !आपबिती ?? :)

vinod.shirodkar111

कधी जाणून पण नाही घेतल कसली भीती वाटायची ती ...
त्या डोळ्यांमध्ये दिसणाऱ्या स्वतःच्याच  प्रतिमेची कि .... त्या डोळ्यांत स्वतःला  हरवण्याची.... माहित नाही


khup avdali hi line... :)

vijaya kelkar

            तू त्या क्षितीजा सारखा ......
    छान...

Shona1109

Thank you so much.... :)