कातरवेळी

Started by vinod.patil.12177276, July 14, 2013, 11:43:46 AM

Previous topic - Next topic

vinod.patil.12177276



- कातरवेळी -

सरणा-या प्रत्येक कातरवेळी
भरुन येतात गतकाळातल्या आठवणी

बसतात थकलेल्या मनाला वास्तवाचे चटके,
कोँदटला जातो श्वास,
गुदमरतो जीव,
मन नुसतच अस्तित्वासाठी

दाटुन आलेल्या स्मृतीँच्या कंठान
होते भावनांची वाट मोकळी
पण...काय अर्थ आहे त्या ओघळणा-या अश्रुंनाही
पुसणारंच नसेल तर....

मंद वा-याच्या संथ झुळकेनं
उमटतात गालांवरती ते अश्रु,
सुप्त थंडीचा मिळतो ओल्या डोळ्यांना गारवा
होतो दाह कमी
मग होते,
आयुष्यातल्या सुख दु:खांची गोळा बेरीज
कधी नशिबाला मिळालेलं दु:ख
कधी कर्मानं हिरावलेलं सुख
कधी कष्टानं जिंकल्याचा आनंद
तर कधी......
मजबुर होवुन पत्करलेली हार...

कधी वाटतं मावळावी एकदाची आठवांची ही संध्याकाळ
उगवेल ही नवविचारांची सकाळ
पण......
पण जाणलेल्या सत्याचा पाणउतारा नाही गं जमत मला
नको वाटतं माझच मन मला मोडायला
हरलेल्या जीवनाला कसं मी तारणार
काहीच समजत नाही,
म्हणुन रिझवतो मन तुझ्या आठवणीत
एकटाच बसुन त्या चांदणीला डोळे लावत
येणा-या प्रत्येक कातरवेळी....

        -विनोद पाटील

sweetsunita66


vinod.patil.12177276


मिलिंद कुंभारे


vinod.patil.12177276

धन्यवाद मिलिंदजी


Pratej10

आयुष्यातल्या सुख दु:खांची गोळा बेरीज
कधी नशिबाला मिळालेलं दु:ख
कधी कर्मानं हिरावलेलं सुख
कधी कष्टानं जिंकल्याचा आनंद
तर कधी......
मजबुर होवुन पत्करलेली हार...


              अप्रतिम

vinod.patil.12177276

kausthubh ji , pratej ji khup khup dhanyavaad.