संशय

Started by कवि - विजय सुर्यवंशी., July 14, 2013, 09:27:06 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

(माझ्या मित्राचं नातं वाचण्यासाठी अन त्याची समजुत काढण्याकरता ह्या सुचलेल्या काही ओळी)     
.
.
           "संशय"
.
.
वर्तमानावर विश्वास ठेव.....
भविष्य कुणी पाहिलंय....
अंतर देऊ नको त्या सखीला....
जिने तुझ्याकरता स्वताचं आयुष्य वाहिलंय....
.
.
संशयात गुंतत गेलास तर....
नुसताच फिरत राहशील.....
माणकापरी उजळ नात्याला....
विश्वासाविना हरवशील....
.
.
सोन्याची पारंख तर....
सोनार सहज करतो....
पण गैरसमजुतीने संशय घेणारा....
नेहमीच दुखात बुडतो....
.
.
विश्वासाने त्या जखमांवर फुंकर घालुन तर बघ....
दैवालाही मग तुझा हेवा असेल....
अन नात्याच्या त्या वेलीवर....
भविष्य उद्याचे दिसेल....
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
       (यांत्रिकी अभियंता)

Çhèx Thakare


कवि - विजय सुर्यवंशी.


vijaya kelkar

     --व्वा छान --

कवि - विजय सुर्यवंशी.

आभारी आहे विजयाजी.

sweetsunita66

छान सल्ला आहे ,मित्राने ऐकले कि नाही ?

कवि - विजय सुर्यवंशी.

अजुन ते दोघेपण नुसतं शांत आहेत