वेडा मुग्गा, शाना मुग्गा...

Started by shashaank, July 15, 2013, 10:50:45 AM

Previous topic - Next topic

shashaank

वेडा मुग्गा, शाना मुग्गा..:o

शाळेत जातो तरी अजून
तोंडात बोट घाल्तात का
वेडा मुग्गा म्हण्तील ना ?

हात कित्ती शी शी आहेत
तस्साच खाऊ खातात का
वेडा मुग्गा म्हण्तील ना ?

जर्रा थोडं लागता कुठे
आईऽ करुन रडतात का
वेडा मुग्गा म्हण्तील ना ?

खाऊ देता कुणी कुणी
देनाऽ गजर लावतात का
वेडा मुग्गा म्हण्तील ना ?

रात्री मात्र माझ्या कुशीत
गाणी ऐकत झोपशील ना
वेडा म्हणू दे कुणीही मग
गळ्यात हात टाकशील ना ??
शाना मुग्गा होशील ना ??   ;)  :)


shashaank purandare.

sweetsunita66


केदार मेहेंदळे


मिलिंद कुंभारे





gouri`

khupach sunder. majha मुग्गा agdi asacha aahe!! Thanks for posting!