कवच

Started by sweetsunita66, July 15, 2013, 11:28:20 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66


कुणीतरी जपावं मला,नाजूक  फुलासारखे
असे प्रत्येकालाच  मनोमनी वाटते न सखे
परी प्रत्येक सुंदर अन अनमोल वस्तूला,
जपण्या साठी जसे कवच असते काही,
तसेच फुलालाही जपण्या साठी काटे असतात नाही ?
पण फुलंच जेव्हा घायाळ होते काट्यांच्या बोचण्याने ,
तेव्हा वाटते हे काट्यांचे कवच नको अन नको ते घायाळणे ,,,,,,,,सुनिता नाड्गे {शेरकर } :)
                                                                             १५जुलै २०१३

vijaya kelkar

सुंदर......
''काटे टोचणे....आई-बापाचे कान टोचणे '' असे मानले तर?

केदार मेहेंदळे


sweetsunita66

''काटे टोचणे....आई-बापाचे कान टोचणे '' असे मानले तर? :D
धन्यवाद केदार आणि विजया !!! आई बापाच्या हाताने कान टोचणे अस म्हणायचं आहे का ?म्हणजे मुलांना  अनुशासन पाळायला लावणे !,हो तसही म्हणता येईल! पण {त्यांचे कान टोचणारे आपण कोण ? :(}

कवि - विजय सुर्यवंशी.

छान...
.
.
पण काट्यांच्या बोचण्याला...
आता शासन माणावं का...?
अन काट्याविना फुलाच्या भावनेला...
बोथट करावं का...?
.
.
काट्याच्या बोचण्यामागे...
त्याचे फुलावरचे प्रेम असते...
जगी उभं राहण्याचं बळ तर...
काट्यानेच दिलेले असते...
.
.
भिरभिरत्या परक्या भुंग्याकरता...
उगाच का आसवं ढाळावीत...
अन फुल आणी काट्याच्या मध्ये...
उगाच का अंतरं आणावीत...
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
       (यांत्रिकी अभियंता)

sweetsunita66

धन्यवाद !! विजय ! वाह वाह !तुम्ही तर इन्स्टट  लिहिता कविता  :)

कवि - विजय सुर्यवंशी.


धन्यवाद !! विजय ! वाह वाह !तुम्ही तर इन्स्टट  लिहिता कविता  :)
.
.
.
.

प्रतिक्रिये करता आभारी आहे सुनीता.... 
सहज एक प्रयत्न होता तो छोटासा.....