मी प्रेम दिले नाही

Started by विक्रांत, July 16, 2013, 11:51:38 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

मी प्रेम दिले नाही
का तिला दिसलेच नाही
वेचले आयुष्य सारे 
का तिला कळलेच नाही

कोसळला पावूस असा
कि अस्तित्व उरलेच नाही
भरल्या पिकास त्याची
याद कधी आलीच नाही

काळोखाशी  लढतांना
दिवा कधी रंगलाच नाही
कुचकामी जगणे ठरले
झोपले त्या दिसलेच नाही

आता सुखाच्या मैफिलीत
वेदनेस या येणेच नाही
आली तरी कोरड्या वाहवे
विना मिळणार काहीच नाही

विक्रांत प्रभाकर

मिलिंद कुंभारे