जीवन- एक उभारी

Started by mrunalwalimbe, July 17, 2013, 03:43:23 PM

Previous topic - Next topic

mrunalwalimbe

         जीवन- एक उभारी
मध्यान्हीचा सूर्य डोक्यावर आला
रखरखणार्या उन्हाच्या झळा ओकू लागला
उन्हाच्या तलखीने रस्त्यावरचा राबता निवळला
हळूहळू सूर्य क्षितिजाकडे सरकू लागला
अरे ही तर सूर्यास्ताची वेळ पाहा
मला वाटले ही तर आयुष्याची संध्याकाळ
पण संधिप्रकाशाच्या तेजाने मन
                झाले प्रसन्न
किती सुंदर हा देखावा
ही तर आहे  सुरुवात नव्याची
हळूवार शितल चांदणे पसरू लागले
फुलवीत आसमंत सारा
मनावरील मळभ दूर झाले
वाटू लागले हीच तर किंमया
आहे निसर्गाची जगरहाटीची
धडपडले तरी नव्याने  उभी राहण्याची
हीच तर आहे उभारी जीवनाची

                                           मृणाल वाळिंबे