नाही उरले क्षण हे भेटीचे

Started by swara, July 18, 2013, 11:25:51 AM

Previous topic - Next topic

swara

नाही उरले
क्षण हे भेटीचे
आज स्मरले सारे
मनाला या आस लागली
स्वप्न निसटले माझे

जणू नदीच्या काठावरती
पापणी भिजून ओली
सारखे सारखे तुझ्यामध्ये
मन गुंतते माझे
भान हरपले जरी सारे
स्वप्न निसटले माझे


चांद हा रात्रीच्या अंधारातूनी
परत दुखी झाला
हृदयामधुनी श्वासामधूनी
भास मिसळले सारे
स्वप्न निसटले माझे

मिलिंद कुंभारे