संन्यास

Started by विक्रांत, July 20, 2013, 08:01:05 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


संन्यास एक फुल असते मनात उगवून आलेले
लाल शेंदरी रंगाने त्या आत बाहेरून रंगलेले ||
संन्यास एक धून असते मना मध्ये वाजणारी
लौकिकाच्या आकांक्षा सहज सुटून देणारी  ||
संन्यास एक गाणे असते जीवन गाणे झालेले
सह्जानंदी आत्मसुखाच्या हिंदोळ्यावर बसलेले ||
संन्याशाचे गाव कुणा का सहज असे मिळते
दिव्यत्वाचे ओढ तिथे जीवन जळावे लागते ||
जीवनाने दिले एक ते धन्य वरदान असते
भाग्यवशे कधी कुणाचे आयुष्य आनंद होते ||
प्रभूप्रेमाच्या प्रवासातील पेणे शेवटचे ते असते
अग्नीवेशी धुरंधरास ठाणे ठावूक ते असते ||

विक्रांत प्रभाकर

केदार मेहेंदळे


sweetsunita66

 का रे बाबा ??सन्यास घेण्याचा विचार ?

shashaank

फारच सुंदर कविता.

मी माझे ऐसी आठवण | विसरले जयाचे अंतःकरण | पार्था तो संन्यासी जाण | निरंतर || श्री ज्ञानेश्वरी ||

संन्यास घेणे याला काहीच अर्थ नाही; कारण "संन्यास म्हणजे काही न घेणे" - आ. विनोबा भावे.

विक्रांत

तुम्हा तिघांच्या तीन प्रतिक्रिया प्रातिनिधिक आहेत ,आवडल्या .bye the way ..काही गोष्टींची वाट पाहणेच चांगले .