जाग

Started by swatium, July 20, 2013, 11:42:02 PM

Previous topic - Next topic

swatium

जाग



चांदणं वेचले

स्वप्नात जगले

उल्कानी हात भाजले

स्वप्नातून जागले

दिशा दिशातून काजळले

रानोमाळ पेटले

पक्षी रोपटी

वाचवता वाचवता थकले 

माणसातून माणूसपण लोपले

आपले म्हणून सार्यांना कवटाळले

माझ्यातून  मीच हरवले !

..................स्वाती  मेहेंदळे

केदार मेहेंदळे

माझ्यातून  मीच हरवले !
....hmn hmn hmn

sweetsunita66

मस्तच आहे !!! मिसेस मेहेंदळे  :)