मरणासन्न

Started by विक्रांत, July 21, 2013, 03:59:21 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


रक्त काळे उलटी मधले
रस्त्यावरती पुन्हा पडले
थोडे दुखले आत खुपले
मदिराग्रस्त यकृत सडले
भकास हसणे मरू घातले
थुंकीमध्ये गोळा झाले
तसेच शून्य होवून डोळे
अंधारी पुन: हरवून गेले
आणि कृपाळू मरण उदार
उभे ठाकले होते समोर

विक्रांत प्रभाकर