माझ्यासाठी कविता म्हणजे

Started by कवि - विजय सुर्यवंशी., July 25, 2013, 08:06:58 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.




माझ्यासाठी कविता म्हणजे
.
.
माझ्यासाठी...
भावनांचं व्यंजन म्हणजे कविता...
अनं उरी दाटलेल्या...
आसवांचं अंजन म्हणजे कविता...
.
.
व्याकुळ धरेवर पडणारी...
आशेची सर म्हणचे कविता...
अनं सईच्या सोबती व्यतित केलेल्या...
आठवणींची भर म्हणजे कविता...
.
.
प्रितीच्या गंधात न्हाऊनीया...
घातलेली साद म्हणजे कविता...
अनं प्रेमळ त्या हाकेला...
मिळालेली दाद म्हणजे कविता...
.
.
ममतेने भरलेल्या  आईचा...
पदर म्हणजे कविता...
अनं कष्टाने भरलेल्या...
बाबांचा आधार म्हणजे कविता...
.
.
मैत्रिमध्ये असलेला...
त्राण म्हणजे कविता...
अनं मैत्रीखातर त्यागलेला...
प्राण म्हणजे कविता...
.
.
आर्त त्या भावनेला...
मिळालेला शब्द म्हणजे कविता...
अनं अबोल शब्दांत व्यक्त होणारी...
ती आर्त भावना म्हणजे कविता...
.
.

कवि - विजय सुर्यवंशी.
      (यांत्रिकी अभियंता)

sweetsunita66


ममतेने भरलेल्या  आईचा...
पदर म्हणजे कविता...
अनं कष्टाने भरलेल्या...
बाबांचा आधार म्हणजे कविता..
       छान  आहे,


vijaya kelkar

    फारच छान ,
शेवटचे कडवे तर अहाहा !!

कवि - विजय सुर्यवंशी.



ममतेने भरलेल्या  आईचा...
पदर म्हणजे कविता...
अनं कष्टाने भरलेल्या...
बाबांचा आधार म्हणजे कविता..
       छान  आहे,
.
.
.
.
.
.
thanks..... sunitaaji.........

कवि - विजय सुर्यवंशी.


कवि - विजय सुर्यवंशी.


    फारच छान ,
शेवटचे कडवे तर अहाहा !!
.
.
.
.
.
.
thanks...... vijayaaji........