फक्त कातरवेळ...

Started by Ankush S. Navghare, Palghar, July 26, 2013, 01:49:48 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

कातरवेळी येते
आठवण तुझी हृदयात
मग पाहत बसतो
एकाकी शून्यात
भेटत नाहीस तु
काय मी करू
तुझ्या मिठीची ओढ
कशी दूर सारू
पापण्यांतून हळूच
अश्रू डोकावतो
आणि मग तोही
तुलाच शोधत राहतो
गालावरून ओठावर
ओठावरून हृदयावर
एकाकी एकटाच
घरंघळत राहतो
वाटते गेला जिव्हाळा
वाटते गेले प्रेम
नशिबी आली माझ्या
फक्त कातरवेळ...
फक्त कातरवेळ...

...प्रजुन्कुश
...Prajunkush   

www.facebook.com/ankush.navghare.353

केदार मेहेंदळे


Ankush S. Navghare, Palghar


मिलिंद कुंभारे

Prajunkush,

फारच छान .... :)

देवेंद्र

छान लिहितोस मित्रा !

Ankush S. Navghare, Palghar


कवि - विजय सुर्यवंशी.


Ankush S. Navghare, Palghar