चारोळ्या... समोरच्याला विचारावे लागेल...

Started by Ankush S. Navghare, Palghar, July 26, 2013, 02:18:00 AM

Previous topic - Next topic

sweetsunita66


navin

ओढून ताणून बोलणे
बरे जमते तुला
कायमचा माझ्यावर
रागावला माझा शोनुला...
..
चूक झाली माझी
माफीही मागितली खुपदा
देवही म्हणाला असता
इतकी शिक्षा पुरे आता
.
.
.
.
ज्याने चूक आयुष्यात
कधीच केली नाही
त्यालाच चूक दाखवण्याचा
अधिकार राही
..
इतरांशीही भांडणे होतात
मग बोलणेही होते
मग हे सर्व
माझ्याच नशिबी का येते
..
नाते हे असे
मी तर हृदयात ठेवलेय
काही लोकांनी मात्र
वरच्यावर धरलंय
..
इतके समजावले तरी
त्यांचा राग नाही गेला
त्यांना समजावता मात्र
माझा जीव धन्य झाला
.
.
राग मलाही येतो
चीड चीड मीही करतो
पण लगेच दुसरयाच क्षणी
सर्व काही विसरतो
..
नाते हे असेच असते
कधी मजबूत तर नाजुक असते
पण कोणी कसे निभवायचे
हे ज्याच्या त्याच्या मनावर असते
..
आता नाती जोडताना
विचार करावा लागेल
किती खोलवर जायचे हे
समोरच्याला विचारावे लागेल...
समोरच्याला विचारावे लागेल...
...प्रजुन्कुश
...Navin