चारोळ्या... समोरच्याला विचारावे लागेल...

Started by Ankush S. Navghare, Palghar, July 26, 2013, 02:18:00 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

ओढून ताणून बोलणे
बरे जमते तुला
कायमचा माझ्यावर
रागावला माझा शोनुला...
.
.
.
.
चूक झाली माझी
माफीही मागितली खुपदा
देवही म्हणाला असता
इतकी शिक्षा पुरे आता
.
.
.
.
ज्याने चूक आयुष्यात
कधीच केली नाही
त्यालाच चूक दाखवण्याचा
अधिकार राही
.
.
.
.
इतरांशीही भांडणे होतात
मग बोलणेही होते
मग हे सर्व
माझ्याच नशिबी का येते
.
.
.
.
नाते हे असे
मी तर हृदयात ठेवलेय
काही लोकांनी मात्र
वरच्यावर धरलंय
.
.
.
.
इतके समजावले तरी
त्यांचा राग नाही गेला
त्यांना समजावता मात्र
माझा जीव धन्य झाला
.
.
.
.
राग मलाही येतो
चीड चीड मीही करतो
पण लगेच दुसरयाच क्षणी
सर्व काही विसरतो
.
.
.
.
नाते हे असेच असते
कधी मजबूत तर नाजुक असते
पण कोणी कसे निभवायचे
हे ज्याच्या त्याच्या मनावर असते
.
.
.
.
आता नाती जोडताना
विचार करावा लागेल
किती खोलवर जायचे हे
समोरच्याला विचारावे लागेल...
समोरच्याला विचारावे लागेल...

...प्रजुन्कुश
...Prajunkush

swara

रागावला आहे स्वतःवर
कि समजूत काढतोयस ?

any ways
कवितेतून तुझे भाव स्पष्ट होतात  :)

Ankush S. Navghare, Palghar


Çhèx Thakare

काय लिहलय राव तू एकदम मस्त
शब्द तूझे पण भावना माझ्या आहेत या

तूझा एफ बी आय डी मेसेज करशील मला रे


Çhèx Thakare


Madhura Kulkarni

अंकुश दादा,
                कविता छान आहे.
_______________________________________________________________________________________
अवांतर:
  नात्यांमध्ये असं ठरवून खोलवर नाही रे जाता येत....त्यांचा गहिरेपणा हा आपसूक अधिक-अधिक होत जातो....मी हे मैत्रीबद्दल आणि नातेवाईकांबद्दल बोलतीये आणि तू ज्या नात्यांबद्दल हि कविता लिहीलीयेस त्यातही असच असावं . नाती टिकतात, अर्थात प्रेम खर असेल तर आणि तेही दोन्ही बाजूंनी...एकेरी प्रेम कायम नुकसान करत...बाकी 'प्राजू'ला हि कविता नक्की दाखव, आवडेल तिला.

Ankush S. Navghare, Palghar

धन्यवाद मधुरा जी...

तस नाही हो पण कधी कधी वाटते असा काही तरी उगाचच निरर्थक...


Çhèx Thakare

tumchi privacy khupach japaleli ahe tumi so jr thoda vel bhetla tr mala reqst pathava :)

link avlble ahe mazi

f.com/chex.thakare