ती एकटीच

Started by vinay0904, July 26, 2013, 09:40:02 PM

Previous topic - Next topic

vinay0904

                    ति...
ती एकटीच ,
अन हे एकटेपण तिच्यावर लादलेलं
अनेक कटू आणी वाईट प्रसंगातून
एकटेपण असह्य होऊन
ती मिसळली गर्दीत
तिला नव्हती जाणीव
गर्दीला नसतो चेहरा याची
गर्दीत असतो प्रचंड कोलाहल
असह्य धक्काबुक्की आणि
अपरिहार्य बधिरता
गर्दीनेही तिला क्षणार्धात आपलासे केले
कारण गर्दीलाही नेहमी हवे असतात सहकारी
चेहरा नसलेले
गर्दीतला प्रत्येकजण तिच्या कानीकपाळी ओरडू लागला
स्वतःच्या वेदना सल तिच्या समोर मांडू लागला
प्रत्येकाची एकच इच्छा
आपल्या दुखात तिने रडले पाहिजे
आपल्या आनंदात तिने हसले पाहिजे
स्वतःचे अस्तित्व विसरून
पण स्वतःचे अस्तित्व
गर्दीत सुद्धा  विसरायचे नसते
हा नियम तिला माहीतच नव्हता
आणी गर्दीनेही तो तिला कधी सांगायची
तसदी घेतली नाही
कारण गर्दीला मिळाले होते एक खेळणे
किल्लीवर चालणारे
स्वतःचे अस्तित्व विसरून
छोटीशी असणारी फुलराणी ती
आता गर्दीने फुलवेडी हे नाव दिले... पूर्ण वेडी
तिनेही हे अवास्तव स्वीकारलं
आणी हरवून गेली गर्दीमध्ये
मनामध्ये सुंदर राजकुमाराची
स्वप्ने पाहणारी सिंड्रेला ...
गर्दीची होऊन गेलि.
गोष्टीतले ते शुभ्र घोडे प्रत्यक्षात उंदीर झाले
आणी तिला कुरतडू लागले
त्या सुंदर रथाचा पुन्हा भोपळा झाला आणी
भ्रमाचा भोपळा फुटून गेला
ते काचेचे बूट तुटले
आणी त्याच काचांनी तिचे नाजूक पाय
रक्ताळून गेले
या गर्दीत आपणच सिंड्रेला आहोत हे
ती विसरूनच गेलि.... आणी
अचानक तो आला
कथेतल्या राजकुमारा सारखा तो सुंदर नव्हता
त्याच्याकडे काचेचा बूटही नव्हता
पण त्याच्याकडे होते काचेसारखेच स्वच्छ पाणी
त्याने गर्दीतही ओळखले
तिचे न लपणारे सोंदर्य
पाणी ओतले तिच्या
धुळीमध्ये अस्पष्ट होत जाणाऱ्या चेहऱ्यावर
आणी उन्हामध्ये तापलेल्या जमिनीत
अस्तित्व मिटून घेतलेल्या बीजावर
पाणी पडल्या प्रमाणे ती अल्हादुन गेली
अस्तित्वाचे अंकूर बाहेर पडण्यासाठी
धडपडू लागले
तिच्यामध्ये होणाऱ्या बदलामुळे
गर्दीसुद्धा थबकली
बीजामध्ये गुदमरलेली वेल
प्रचंड वेगाने बाहेर पडली
आणी बहरू लागली
तिला फुलवेडी म्हणणारे
या वेलीवरच्या फुलांच्या
रंगछटानी आणी सुगंधाने
स्वतःच वेडे झाले
पण तरीही तिला ही गर्दी सोडायची नाही आहे
आणि म्हणूनच तिने केला निश्चय
त्याच्या सहकार्याने
गर्दीला चेहरा देण्याचा
अस्तित्व देण्याचा .
             
                              Vinay Deshpande

Saiprasad


                    ति...
ती एकटीच ,
अन हे एकटेपण तिच्यावर लादलेलं
अनेक कटू आणी वाईट प्रसंगातून
एकटेपण असह्य होऊन
ती मिसळली गर्दीत
तिला नव्हती जाणीव
गर्दीला नसतो चेहरा याची
गर्दीत असतो प्रचंड कोलाहल
असह्य धक्काबुक्की आणि
अपरिहार्य बधिरता
गर्दीनेही तिला क्षणार्धात आपलासे केले
कारण गर्दीलाही नेहमी हवे असतात सहकारी
चेहरा नसलेले
गर्दीतला प्रत्येकजण तिच्या कानीकपाळी ओरडू लागला
स्वतःच्या वेदना सल तिच्या समोर मांडू लागला
प्रत्येकाची एकच इच्छा
आपल्या दुखात तिने रडले पाहिजे
आपल्या आनंदात तिने हसले पाहिजे
स्वतःचे अस्तित्व विसरून
पण स्वतःचे अस्तित्व
गर्दीत सुद्धा  विसरायचे नसते
हा नियम तिला माहीतच नव्हता
आणी गर्दीनेही तो तिला कधी सांगायची
तसदी घेतली नाही
कारण गर्दीला मिळाले होते एक खेळणे
किल्लीवर चालणारे
स्वतःचे अस्तित्व विसरून
छोटीशी असणारी फुलराणी ती
आता गर्दीने फुलवेडी हे नाव दिले... पूर्ण वेडी
तिनेही हे अवास्तव स्वीकारलं
आणी हरवून गेली गर्दीमध्ये
मनामध्ये सुंदर राजकुमाराची
स्वप्ने पाहणारी सिंड्रेला ...
गर्दीची होऊन गेलि.
गोष्टीतले ते शुभ्र घोडे प्रत्यक्षात उंदीर झाले
आणी तिला कुरतडू लागले
त्या सुंदर रथाचा पुन्हा भोपळा झाला आणी
भ्रमाचा भोपळा फुटून गेला
ते काचेचे बूट तुटले
आणी त्याच काचांनी तिचे नाजूक पाय
रक्ताळून गेले
या गर्दीत आपणच सिंड्रेला आहोत हे
ती विसरूनच गेलि.... आणी
अचानक तो आला
कथेतल्या राजकुमारा सारखा तो सुंदर नव्हता
त्याच्याकडे काचेचा बूटही नव्हता
पण त्याच्याकडे होते काचेसारखेच स्वच्छ पाणी
त्याने गर्दीतही ओळखले
तिचे न लपणारे सोंदर्य
पाणी ओतले तिच्या
धुळीमध्ये अस्पष्ट होत जाणाऱ्या चेहऱ्यावर
आणी उन्हामध्ये तापलेल्या जमिनीत
अस्तित्व मिटून घेतलेल्या बीजावर
पाणी पडल्या प्रमाणे ती अल्हादुन गेली
अस्तित्वाचे अंकूर बाहेर पडण्यासाठी
धडपडू लागले
तिच्यामध्ये होणाऱ्या बदलामुळे
गर्दीसुद्धा थबकली
बीजामध्ये गुदमरलेली वेल
प्रचंड वेगाने बाहेर पडली
आणी बहरू लागली
तिला फुलवेडी म्हणणारे
या वेलीवरच्या फुलांच्या
रंगछटानी आणी सुगंधाने
स्वतःच वेडे झाले
पण तरीही तिला ही गर्दी सोडायची नाही आहे
आणि म्हणूनच तिने केला निश्चय
त्याच्या सहकार्याने
गर्दीला चेहरा देण्याचा
अस्तित्व देण्याचा .
             
                              Vinay Deshpande