दुनियादारी

Started by कवि - विजय सुर्यवंशी., July 28, 2013, 12:22:53 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

...... दुनियादारी ......
.
.
.
.
जगाची ही दुनियादारी...
अनं प्रितीची धडधड भारी...
.
.
टिकटिकही वाजेल डोक्यात मग...
जेँव्हा वेडं मन आठवणीच्या धुक्यात असेल...
अनं अनामिक ओढीचं गुढ स्वप्न...
जेंव्हा दोघांच्या अंतरी वसेल...
.
.
वाढतील मग नजरेतील...
प्रेमळ ते ध्यास...
अनं हरवलेल्या धुंद मनाचे...
ते गहिरे आभास...
.
.
ओझरते संपणारे ते अंतर...
अन स्पंदनालाही ना ऊरते जेव्हा गत्यंतर...
पेटणारी ती ओढीची चिंगारी...
जळत राहते मग निरंतर...
.
.
उधाणलेल्या या मनासवेँ...
वाटे करावी खटपट सारी...
अलवार त्या प्रितीसाठी पुन्हा एकदा...
वाटे करावी आता दुनियादारी...
.
.
अलवार स्पर्शाची चाहुल...
अन अडखळणारे ते पाऊल...
का ते डोळे मग वळुनी पाहे...
प्रितीच्या या धुक्यात मग सारेच मनाला साहे...
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
(यांत्रिकी अभियंता)

sweetsunita66


कवि - विजय सुर्यवंशी.


vijaya kelkar

 :)   :) दुनियादारी  :)  :)

कवि - विजय सुर्यवंशी.


:)   :) दुनियादारी  :) :)
.
.
.
.
:D :)