*देवा तुझ्या गाभार्‍याला* - दुनियादारी

Started by swara, July 29, 2013, 03:47:52 PM

Previous topic - Next topic

swara

*देवा तुझ्या गाभार्‍याला*

देवा तुझ्या गाभार्‍याला, उंबराच नाही. सांग कुठे ठेऊ माथा ,  कळणाच काही!
देवा कुठ शोधू तुला , मला सांग ना, प्रेम केल एवढाच, माझा रे गुन्हा!
देवा काळजाची हाक , ऐक एकदातरी , माझ्या या जिवाची आग राहुदे तुझ्या उरी!
आर पार काळजात का दिलास घाव तू, दगडाच्या काळजाचा, दगडाचा देव तू!

का, कधी, कुठे, स्वप्न विरले, प्रेम हरले
स्वप्न माझे, आज नव्याने खुलले, अर्थ सारे स्पर्शाने उलगडले!
आर पार काळजात का दिलास घाव तू, दगडाच्या काळजाचा, दगडाचा देव तू!
देवा काळजाची हाक , ऐक एकदातरी , माझ्या या जिवाची आग राहुदे तुझ्या उरी!

का रे तडफड ही, ह्या काळजामधी, घुसमट तुझी रे, होते का कधी!
माणसाचा तू जन्म घे , डाव जो मांडला, मोडू दे !
का हात सुटले श्वास मिटले , ठेच लागे ,
उत्तरांना प्रश्न, कसे हे पडले, अंतराचे अंतर कसे ना कळले,
देवा काळजाची हाक , ऐक एकदातरी , माझ्या या जिवाची आग राहुदे तुझ्या उरी!
आर पार काळजात का दिलास घाव तू, दगडाच्या काळजाचा, दगडाचा देव तू!

rohidas salve

दगडाच्या काळजाचा, दगडाचा देव तू!
........अप्रतिम.......!