हासता मी

Started by केदार मेहेंदळे, July 29, 2013, 04:08:32 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

 हासता मी, गालावर उमले, गोड नाजुकशी खळी
हासता मी, कलेजावर कितींच्या, फिरते नाजूक सुरी.

मदन बाण नजरेतून सुटती, पायांमधले चाळ खुळावती
हासता मी, म्हणती आशिक, "वाह! अदा हि खरी".

भरजरी शालू, दागदागिने, राण्णी राज्जाची मी जशी
हासता मी मग, विसरून जाते, नायकिण मी खरी.

रोज रातीला, नाचवते मज, पोटाची खळगी
हासता मी परी, सर्व समजती, उर्वशीच मी खरी.

माडीवरच्या या राणीची, सदा, रिकामीच झोळी
हासता मी जरी, कितीक उधळती, दौलत माझ्या वरी.

रोज रातीला रडूनी निजतो, फाटक्या धड्प्या वरी
हासता मी, धावून बिलगतो, बाळ माझिया उरी.

कित्येकांच्या या राणीला, न मिळे कुंकवाचा धनी
हासता मी पण, सहज विसरते, नशिबाची हि उणी.

आशिक सगळे ह्या शरीराचे, मैत्र जिवाचे न कुणी
हासता मी, हे सहज लपवते, शल्य माझिया उरी.

हासता मी, गालावर वाहे, उष्ण अश्रूंची नदी
हासता मी कलेजात माझ्या, रोजच घुसते सुरी.


केदार.....


मिलिंद कुंभारे

केदार दादा,
  अप्रतिम, फारच छान ,
मनापासून आवडली ......  :)

santoshi.world

one of ur best poem ...........