छंद स्वप्नांचा..

Started by balrambhosle, July 30, 2013, 12:19:25 AM

Previous topic - Next topic

balrambhosle

छंद स्वप्नांचा..

यंदाची पावसाची सर..
आज मनात गोंधळ घालून गेली
सोसाट वाऱ्याच्या झोतात
जुन्या आठवणी घेऊन आली

परके झालेले जिवलग
आज आपुलकीचे वाटत होते
गुंतलेले नात्यांचे जाळे
आज हृदयात दाटत होते.

उन्ह-सावल्या  सोबत थंडी-वारा
झेपून घेणारं मन
आज एकांत शोधत होतं
कोरडी झालेली आठवणीची पालवी
गार हिरवी करू पाहत होतं

आणि मग पावसाच्या सरी मध्ये मन माझ
चिंब होण्याच्या बेतात च होत
की ओढ्याच्या वाहत्या पाण्यात
खळखळ आवाज करत ते स्वप्न
माझ्या समोर येवून उभ राहिल

काही क्षण वाटल की हे माझंच स्वप्न आहे
पण काल्पनिक स्वप्नांच्या दुनियेतला मी
मला ते थोडं परक वाटायला लागलं

आणि माझ हे विसरभोळ मन
त्याला समजू च शकलं नाही
आणि त्या कडे पाठ्फिरून
काप्लानिक स्वप्नांच्या पावसांत
चिंब होण्यावाचून राहील च नाही.

हा स्वप्नांचा छंद इतका निराळाच का असतो?
कधी क्षणभंगुर आनंद देवून जातो
तर कधी थरकाप आणणाऱ्या लाटांना घेऊन येतो..

--बळीराम भोसले