पडसाद

Started by देवेंद्र, July 30, 2013, 11:15:32 AM

Previous topic - Next topic

देवेंद्र




गुरु ठाकूर याची ही कविता मला खूप आवडते.

कवितेचे शब्द कागदावर उतरतात तेव्हा हात आणि लेखणी भले वेगळी असो,
मनाची आर्तता, भावनांचे आवेग आणि हृदयाच्या स्पंदनांची जातकुळी  एकच असते.
प्रत्येकाच्या क्षितीवरचा  चंद्र वेगळा असला तरी चांदण तेच असतं ....

व्याकूळ अशी नक्षत्रे कोरडीच केवळ जाती
भिजण्याच्या आशेवरती कोमेजून गेल्या राती ...

... येईल का मेघ माझाही अन जाईल का मला भिजवून?   
त्या तेव्हाच्या भिजण्याचे अंतरी अजून पडसाद