घननीळ

Started by aap, July 30, 2013, 04:05:58 PM

Previous topic - Next topic

aap

घननीळ

अंबरी करते सौदामिनी नर्तन

भूवरी जाहले मृदगंधाचे शिंपण

जलद फुटला तो निळा सावळा

पाऊस बरसुनी गेला खळखळा

धुंद पावसाच्या मिठीत भिजली

चिंब धरा देहदिठी शहारली

तिच्या गर्भी जन्मा येई

तृणबाळ अंकुर तो लवलाही

अंकुराचे बाळ चाले दुडूदुडू

पाऊस पॆन्जणाचा नाद रुणुझुणु

अंतराळी खग लाविती सूर

वारा  घाली मधुर फुंकर

मधुबनी अवतरला घननीळ

साद घाली राधेस वाजवून शीळ

                    सौ. अनिता फणसळकर