वाट पाहतोय मरणाची

Started by manishsalunke, July 31, 2013, 06:14:36 PM

Previous topic - Next topic

manishsalunke

आयुष पुढे सरकत,
स्वता वरील प्रेंम कमी करत,
मनातील वेदना लपवत,
ओठावरील शब्द आवरत,
डोळ्यातले पाणी सुखवत,
वाट पाहतोय मरणाची,
सुखाची आशा असतानाही नकोशी मला,
कारण जगायचे कोणाला आता.

निकेता

ह्या कवितेत तुम्ही व्यक्त केलेली मनःस्थिती काही गंभीर शारिरिक व्याधीपायी किंवा आर्थिक हलाखीपायी आहे की केवळ कोणी मुलीने "प्रतिसाद" न दिल्यापायी आहे?

गंभीर शारिरिक व्याधी आणि आर्थिक हलाखी ह्या दोनींपैकी एक, किंवा दोन्ही आपत्ती आल्या असता मनःसौख्य राखणे बरेच कठीण नक्कीच असते, पण त्या परिस्थितींमधेही जगातली कितीतरी माणसे नेटाने मनःसौख्य राखत असतात हे मी इथे आग्रहाने सुचवते.

उलट ह्या कवितेत तुम्ही व्यक्त केलेली मनःस्थिती केवळ कोणी मुलीने "प्रतिसाद" न दिल्यापायी असेल तर ती  मनःस्थिती तारुण्यातल्या नेहमीच्या एका गाढवपणाचा आविष्कार असल्याचेही मी इथे आग्रहाने सुचवते. (कोणतीही तरुणी किंवा तरुण "सर्वगुणसंपन्न" मुळीच नसल्याचे आणि कोणी रागीट असल्याचे, कोणी लहरी असल्याचे, कोणी मत्सरी असल्याचे, वगैरे, वगैरे माणसांमधले काही ना काही दोष लग्नानंतर एका वर्षाच्या आत माणसाच्या लक्षात येत असतात.)  तेव्हा "मरणाची वाट पहात" वेळ घालवण्याऐवजी माणसांच्या सामुहिक आयुष्याचा व्यापक दृष्टिकोन राखून आणि तुमच्या कितीतरी वैयक्तिक दैवी देणग्यांची प्रकर्षाने जाणीव राखून तुम्ही तुमचे आयुष्य आनंदात घालवावेत.   

माझ्या तुम्हाला शुभेच्छा.