मालकंस

Started by देवेंद्र, August 01, 2013, 12:35:08 PM

Previous topic - Next topic

देवेंद्र

त्या सुंदर सांजकाळी
सूर्य धरेला निरोप देताना
क्षितिजावर झालेली रंगांची उधळण
सखे तुझ्या डोळ्यात पाहताना

आणि त्याच वेळी
गळ्यातल्या तुझ्या हातांना
मी हलकेच तोलून धरताना छानसं हसत होती
तूझ्या चेहेरयामागे उगवणारी चंद्रकोर

जणू फक्त दोघांसाठीच
निसर्ग रंगवीत होता ते चित्र
तुला मिठीत घेताना तुझ्या अधरांवर
जेव्हा मी अलगद ओंठ ठेवले

झाडावरच्या पक्षांनी एकाच गलका केला
आणि जेव्हा डोळे उघडले
तेव्हा चंद्रप्रकाशात नाहलेली
ती सुंदर रात्र मालकंस आळवीत होती

- देवेंद्र

संदीप

रात्र संपली, सकाळ झाली
मुखप्रक्षालनादी करूनी
चहा केला, प्यालो आणि
खाल्ले बिस्कुट, केली आंघोळ
वाचला "पेपर" थोडा वेळ
निघालो मग करून कपडे
नित्याप्रमाणे ऑफिसकडे
खर्डेघाशी करायला.
सांगतो, वाचक, आहे माझा
"बॉस" म्हणजे अगदी साक्षात्‌
कंसाचाच एक अवतार!