सोन्याचे दिवस.....

Started by Rupesh_, August 01, 2013, 05:30:24 PM

Previous topic - Next topic

Rupesh_


सोन्याचे दिवस.....

तू खिडकीत बसून माझी वाट पाहत असशील
मी बेल वाजवायच्या आधीच दार उघडशील

तू म्हणशील आज किती उशीर केला तुम्ही
किती वेळ झाला वाट पाहत आहे मी

मग मी sorry म्हणेल जवळ घेऊन तुला
वाट पहावी लागली आज माझ्या राणीला

तू लाजून थोडसं माझ्या डोळ्यात बघशील
माझी मिठी घट्ट होताच किचन मध्ये पळशील

मग मी जाइन आत थोडं फ्रेश होण्यासाठी
तू करशील किचन मध्ये चहा माझ्यासाठी

मी तुला बघत बघत चहा पीत असेल
टीवी असेल सुरु पण लक्ष माझं नसेल

तू हळुवार हसत असशील माझ्याकडे बघून
आनंद होत असेल खूप तुलाही मनातून

तू असशील माझ्या सोबत दिवस असतील ते सोन्याचे
एकमेकात हरवून जाऊन एकमेकांचा होण्याचे

                             -- रुपेश