कौर सिस्टर .

Started by विक्रांत, August 01, 2013, 05:37:41 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

ती सदैव सज्ज येथे
हाती घेवून ईमान आहे |
जीभ नव्हे तिची ती   
तेज अकाल कृपाण आहे |
नानकांचे प्रेम ती
गोविदांचा बाण आहे |
रुग्णांसाठी माय मवाळ
आळश्यासाठी सैतान आहे |
आत बाहेर काहीच नाही
स्वच्छ आरश्या समान आहे |
हि इतर कोण असणार
कौर माझी बहिण आहे  |

विक्रांत प्रभाकर

केदार मेहेंदळे


विक्रांत

एक विलक्षण, अस्सल पंजाबी सिस्टर ,हॉस्पिटलमधील .