आताशीच आले बळ पंखात माझ्या

Started by केदार मेहेंदळे, August 02, 2013, 01:16:44 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

 आताशीच आले बळ पंखात माझ्या
भिती गगनाची अजुनी मनांत माझ्या

शालिन, सोशिक अन अपेक्षांच्या
बेड्या उगाच का पायांत माझ्या?

लांघला जरी मी उंबरठा घराचा
भिती रावणाची हि मनात माझ्या

शिकले जरी का कुंभार सगळे
अग्नीदिव्य अजूनही नशिबात माझ्या

जरी घेतली मी गगन भरारी
रमते अजूनही घरात माझ्या

मनांस माझ्या भुलवतो सख्यारे
फुलला अंगणी जो पारिजात माझ्या

पसरले जरी पंख उडण्या सख्या मी
असूदे तुझा हात हातांत माझ्या

जगाचे साम्राज्य? मला काय त्याचे
माळ एक गजरा बसं केसांत माझ्या

केदार......

Ankush S. Navghare, Palghar


मिलिंद कुंभारे


sweetsunita66

वाह वाह मस्त कविता आहे केदार  :) :) :)

विक्रांत

शिकले जरी का कुंभार सगळे
अग्नीदिव्य अजूनही नशिबात माझ्या

ha punch jast  aavadala

aspradhan

 कवितेतील भाव फार छान व्यक्त  झालेत !!मनः पूर्वक अभिनंदन !अश्या  कविता आणखी लिहा .!!!